




मी मिहाना
मिहाना पब्लिकेशन्स ही प्रकाशन संस्था २०१८ मधे सुरू झाली आहे. सासरच्या कुटुंबाचा व्यवसाय हा नवनवीन कल्पना, नूतन उपक्रम, नवे तंत्रज्ञान, अभिनव विपणन पद्धती यांच्या साहाय्याने आणखी भरभराटीला कसा आणता येईल या विचारातून २०१८ मध्ये सरकारच्या पुस्तक निविदेच्या निमित्ताने एक नवे प्रकाशन सुरू झाले ते म्हणजे मिहाना पब्लिकेशन्स.
मिहिका व अहना या दोन कन्यांच्या नावांचा मिलाफ म्हणजे ‘मिहाना’ असे ऋतुपर्ण यांनी सुचवलेले नाव आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशन संस्थेचे संस्थापक कै. अनंतराव कुलकर्णी यांच्या नातसून अमृता कुलकर्णी यांनी सुरू केलेली ‘मिहाना पब्लिकेशन्स’ ही संस्था आजेसासरे यांचा ‘परंपरा आणि प्रगति’ हा वारसा घेऊनच पुढे जात आहे. तरुण पिढीने वाचावं आणि लिहावं देखील यासाठी ‘मिहाना’ ही संस्था विशेषत्वाने पुढाकार घेते आहे.‘संदूक’ नावाचा कवितासंग्रह आर्या कुलकर्णी या ‘अवघे एकोणीस वर्ष’ असलेल्या कवयित्रीचा आहे. ही ‘मिहाना’च्या लेखकमंडळातील सर्वांत लहान कवयित्री आहे.
मिहानातर्फे आत्तापर्यंत डॉ. सुमती क्षेत्रमाडे, नारायण गुणे, डॉ. ज्योती चिंचणीकर, अर्चना देव, मेजर मोहिनी गर्गे, गझलकार सुधीर कुबेर, भारतीयविद्या पारंगत डॉ. हरीश ठक्कर, प्रियांका कर्णिक (असिस्टंट गव्हर्नर ऑफ रोटरी 3131) यांच्यासारख्या नामवंत लेखकांचे बरेच ग्रंथ प्रकाशित झाले आहेत. समाजात वाचनसंस्कृतीचे वाचन, संवर्धन होण्यासाठी मिहानातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. जबाबदारीपूर्वक कामाची वाटणी, संघटनकौशल्य, नेतृत्व आणि संवादकौशल्य तसेच सातत्याने कष्ट ही तत्त्वे व्यावसायिक पातळीवर हे उभयता कटाक्षाने पाळत आहेत.

Our Story
What client says

‘‘युनिटी अँड हार्मनी’’ म्हणजेच ‘‘ऐक्य आणि सुसंवाद’’ हे मिहानाचे ब्रीदवाक्य आहे.
आत्तापर्यंत सव्वाशेहून अधिक ग्रंथ ‘मिहाना पब्लिकेशन्स’तर्फे प्रकाशित झाले आहेत. अनेकविध विषयांवरील माहिती-तंत्रज्ञान, ललित, वैचारिक आणि धार्मिक स्वरूपाची पुस्तके ‘मिहाना’तर्फे वाचकांना उपलब्ध होऊ शकत आहेत याचा ‘मिहाना’ परिवाराला अधिक आनंद होत आहे. मिहानाच्या पहिल्याच प्रकाशित पुस्तकास पुरस्कार २०२३ मध्ये प्राप्त झाला आहे. त्यानंतरही अनेक पुस्तकांना निर्मितीमूल्यासाठी राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त आहेत.
सदर संस्था अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाची आजीव सभासद असून प्रोप्रायटर अमृता कुलकर्णी या संघाच्या कार्यकारिणी मंडळावर सदस्य म्हणून उपाययोजना करून, संबंधित अधिकारी, शासकीय ग्रंथालये राजकीय पदाधिकारी यांच्यातर्फे संघाला जागतिक पातळीवर समर्थ बनविण्याचे काम इथे उत्साहाने केले जाते. मिहाना रोटरीच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रमांद्वारे ग्रंथसेवा व वाचनसंस्कृती जागृत ठेवून, वाढवत आहे.